महिला दिनी महिलांना मिळणार घरकुलाचा लाभ !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- राज्यात जागतिक महिला दिनापासून म्हणजेच आजपासून महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतंर्गत महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच स्वयंसाहय्यता गटातील 100 टक्के लाभार्थी महिलांना घरकुलांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मागील महिन्यांत काढलेला आहे. यात 8 मार्चपासून 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवसापर्यंत महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

यात महिलांचा जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व स्वच्छता कार्यक्रमाची माहिती महिलांना देण्यात येणार आहे.

यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, कार्यक्रमाचा लाभ महिलांना मिळवून देण्यात येणार आहे. यात बचम गटाच्या महिलांना शंभर टक्केे घरकुलांचा लाभ मिळून देण्यात येणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe