एकापाठोपाठ एका जीवघेण्या संकटानं दुध धंद्यावर संकटं आणली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग संकटात सापडले. ग्रामीण भागातील दूध व्यवसायदेखील मरणपंथाला लागला आहे.

ढासळलेले दूधदर आणि पाच महिन्यात सुमारे ८०० रुपयांपर्यंत पशूखाद्याचे वधारलेले दर, असे विरोधी चित्र तयार झाल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.

दुर्देवाने या गंभीर प्रश्नाकडे कुणाचे लक्ष नाही.दूधउत्पादकांना वाचवण्यासाठी शासनाने दूध उत्पादकांना अनुदान लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी दूधउत्पादक करत आहेत.

गोल्डन क्रेडिट कार्ड म्हणून ओळख असलेल्या दुधाच्या किटलीचा व्यवसाय सध्या कोविडच्या महामारीच्या कचाट्यात सापडला असून,

अस्मानी व सुलतानी या दोन्ही संकटाला शेतकरी वर्ग कायम प्रथमस्थानी जात असल्याने जे काय नुकसान होणार ते आधी शेतकऱ्याचे होणार हा इतिहास आहे.

त्यात जेव्हा बदल घडेल तेव्हापासूनच शेतकऱ्याचा सुवर्ण दिवस चालू होईल, पण तूर्त मात्र या कोरोनाच्या वक्रदृष्टीने शेतकरी वर्ग मोठया अडचणीत आला असून, कधी काळी ३३ रुपयांपर्यंत गेलेला दूधाचा दर आठ ते दहा रुपयांनी लिटर खाली आला.

मात्र पशूखाद्याचे भाव कमी होण्याऐवजी डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत हजार ते अकराशे रुपयांना मिळणारे ५० किलोचे पोते मात्र १८०० रुपयांपर्यंत गेल्याने, दुभते पशुधन कसे जतन करायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्यात कडक उन्हाळा त्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होणे दुर्मिळ, जनावरांचे बाजार बंद असल्याने पशुधन विक्रीस भाव नाही. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडत आहे.

यात कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा वाटा आहे. एकापाठोपाठ एका जीवघेण्या संकटानं दुध धंद्यावर संकटं आणली. केंद्र आणि राज्य सरकारची व्यवसायविरोधी ही धोरणेही तेवढीच जबाबदार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe