अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेला रात्री अचानक आग लागून बागेचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत सविस्तर असे की, खर्डा भूम रस्त्यावरील शेतकरी शौकत शब्बीर शेख यांच्या डाळिंबाच्या बागेला रात्री अचानक आग लागली.
यात डाळिंब पिकाचे तर मोठे नुकसान झाले तसेच पिकासाठी केलेल्या ठिबक सिंचन देखील जळून नुकसान झाले. शेख या शेतकऱ्याने मोठ्या आशेने अडीच एकरावर ठिबक सिंचनावर डाळिंबाची बाग फुलविली होती.
परंतु अचानक आग लागल्याने या आगीमध्ये डाळिंबाच्याबागेचे मोठे नुकसान झाले. खर्ड्याचे कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी या जळीत फळबागेचा केला असून यात सुमारे ४ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
नुकताच रमजान महिना चालू झाल्यामुळे मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली होती. परंतु अचानक झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या उत्पन्नाच्या आशेवर आगीमुळे पाणी फिरले.
या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज काढून फळबाग लागवड करून जगवली होती अशी माहिती शेतकऱ्याने दिली. परंतु लागलेल्या आगीच्या संकटामुळे बहरलेली डाळिंब बाग लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या आर्थिक उत्पन्नाचे स्वप्न भंगले.
रात्री लागलेल्या आगीमुळे जवळील पेट्रोल पंपावरील नागरिकांनी शेतकरी शौकत शेख यांना रात्रीच कळवले शौकत शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात न आल्याने डाळिंब बागेचे मोठे नुकसान झाले.
शासकीय पंचनामा कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी केला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. फळ बागेसह ठिबकच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाई मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शौकत शेख या शेतकऱ्याकडून करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|