अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वृद्धेश्वर देवस्थान व मच्छिंद्रनाथ देवस्थान या दोन्ही महत्त्वपूर्ण देवस्थानला जोडणाऱ्या सावरगाव घाटात ठिक ठिकाणी दरड कोसळल्याने व जंगलातील रस्त्यालगतची झाडे थेट घाटातील रस्त्यावरच आडवी झाल्याने जड वाहनांसाठी हा रस्ता आता बंद झाला आहे.
मोटारसायकलस्वार मोठी कसरत करून या घाटातून प्रवास करत असले तरी घाटातील रस्त्यावर लहान-मोठे दगड वाहून आल्याने घाटातील रस्ता धोकादायक बनला असुन अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे.

पाथर्डी व आष्टी तालुक्यातील प्रवाशांसाठी सावरगाव घाट फार महत्वाचा मानला जातो. काही दिवसांपूर्वीच मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व घाटशिरस गावचे सरपंच गणेश पालवे यांच्या माध्यमातून दोन्ही देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.
परंतु सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या घाटातील रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम