अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद शाळेतून टीव्ही संचाची चोरी करणाऱ्या चौघांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या चोरट्यांकडून चोरी करण्यात आलेला टीव्ही संचही ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अंदाजे १ लाख रुपयांचा एलईडी टीव्ही संच ३ ऑगस्ट रोजी चोरीस गेला होता. शाळेतील डिजिटल रूमचा दरवाजा तोडून ही चाेरी झाली होती.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा कर्जत पोलिसांनी बारकाईने तपास केला.
स्वप्नील गायकवाड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपी स्वप्नील गायकवाड (रा. बेलगाव, ता. कर्जत) ला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यात गणेश निंबाळकर (वय २५), निखिल पवार (वय २४), शुभम ऊर्फ भुंग्या गायकवाड (वय २४) या साथीदारांचा सहभाग असल्याची कबुली दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













