अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-कोरोना काळात आरोग्याची काळीज घेणे अत्यंत गरजेचे बनून बसले आहे. यातच सॅनिटायझरचा वापर प्रत्येक जण करत आहे.
याचाच फायदा घेऊन विनापरवाना हँड सॅनिटायझर बनवून त्याची विक्री करणार्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दरम्यान विकास गुलाब तिखे (रा. काष्टी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कच्चे रसायन असा एकूण 2 लाख 18 हजार 366 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त खबर्यामार्फत माहीती मिळाली की,
विकास गुलाब तिखे हा अन्न औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे हँण्ड सॅनिटायझर (जंतुनाशक) तयार करुन त्याची विक्री मेडीकल, दवाखाना व इतर ठिकाणी करत आहे.
या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी काष्टी-तांदळी रस्त्यावरील शिक्षक कॉलनी जवळ छापा टाकला. यावेळी तेथे पत्र्याच्या शेडमध्ये विकास गुलाब तिखे (वय 28 वर्षे, रा. दत्तचौक, काष्टी) हा निळ्या रंगाचे पाणी व इतर रसायन मिसळून त्यापासून हँण्ड सॅनिटायझर तयार करताना आढळून आला.
त्याच्याकडून सॅनिटायझर बनविण्यासाठी लागणारे साहीत्य असा एकुण 2 लाख 18 हजार 366 रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहे. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|