अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील राशीन रोडवर असलेलं बहार नावाचे टायर पंचर दुकान अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या.
त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान या चोरी प्रकरणातील आरोपी हे राशीन येथील असल्याचे समजले. सविस्तर माहिती घेऊन पोलिसांनी राशीन येथील एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले.
यामध्ये महेश दिपक माने (राशीन), विशाल गंगा जाधव (राशीन), अभिषेक उर्फ बबलू विजय घोडके (राशीन), अविनाश गणपत भाले (राशीन), राहुल संतोष उफाडे (राशीन), एक अल्पवयीन, रा. राशीन यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.
त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती आणि जितो अशी २ चार चाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केली.
गुन्ह्यातील चोरलेले २५ टायर हस्तगत केले. एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला असुन ५ आरोपींना अटक केली. त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|