तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील जुने मटण मार्केट,बाजार तळ येथील एकास विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तंजील गफार खान, (वय 23 वर्षे, रा.हुसेन नगर, श्रीरामपूर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

पोलीस शिपाई पंकज गोसावी यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अणे तलवारी सापडल्या असल्याच्या घटना घडल्या आहे.

मे महिन्यामध्ये श्रीरामपूर पोलिसांनी वडाळा महादेव भागात एका तडीपार आरोपी कडून एक तलवार, एमआयडीसी भागात एका आरोपीकडून एक तलवार, तसेच वार्ड नंबर 2 मध्ये दोन हातात दोन तलवारी घेऊन फिरणाऱ्या शाहरुख शेख कडून दोन तलवारी तसेच

मागच्याच आठवड्यात तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र वाईन्स जवळून एक तलवार व आत्ता खानकडे मिळालेली ही अजुन एक तलवार अशा एकूण तब्बल ०६ तलवारी मे महिन्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त केल्या आहेत.

श्रीरामपूर शहरात एका महिन्यात जर ०६ तलवारी मिळत आहेत तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इतर लोकांकडे असे किती तरी हत्यार असतील तरी त्याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe