गोळीबार करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात काही दिवसांपूर्वी काही चोरटयांनी निंबोडी या गावांमधून शेळी चोरून नेत असताना या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला असता एकाने गोळीबार करून दोन ग्रामस्थांना जखमी केले होते.

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमर दत्तु पवार (वय २६ वर्ष रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील निंबोडी या गावामध्ये (दि १०) रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटे आले होते.

त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांची इतर नातेवाईकही जागे झाले.

त्यावेळी चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली. परंतु जमलेल्या सहा जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि एका चोरट्याला पकडले त्यावेळी इतर दोन चोरटे पळून गेले.

मात्र त्यानंतर दोघे चोरटे परत आले व त्यांनी पकडलेल्या साथीदाराला सोडा अन्यथा गोळ्या घालून असा दम दिला. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर पोलिसांनी या चोरट्यास मोठ्या शिताफीने पकडले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe