अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-रेशनधारकांसाठी आलेले स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्हयातील कर्जत तालुक्यात घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब दादासाहेब ढेरे, रेवणनाथ मुरलीधर ढेरे, श्रीकांत प्रकाश ढेरे (तिघेही रा. वीट, ता. करमाळा) यांना अटक केली.
या भामट्यांकडून पोलिसांनी गहू, तांदूळ व चारचाकी दोन वाहने, असा तब्बल 10 लाखाहून अधिकचा माल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
कर्जात तालुक्यातील राशीन- करमाळा रस्त्यावर स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली.
पोलीस पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यांनी धान्य घेऊन जाणारे एक वाहन अडवले व गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे पोलिसांनी वाहनांमधील 55 किलो वजनाच्या तांदळाच्या 72 व गव्हाच्या आठ गोण्यांसह दोन वाहने, असा साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|