अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाईच्या नावाखाली पोलीस सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याचा आरोप करुन, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सोबत असणारे कर्मचार्यांनी शहानवाज इक्बाल कुरेशी यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले.
यावेळी समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे, जहीर सय्यद, राजेंद्र गायकवाड, मुन्ना भाई, परवेज खान, मुबीन सय्यद, शफी खान, मोहंमद हुसैन, तौसीफ शेख आदी उपस्थित होते.
शुक्रवार दि.2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शहानवाज इकबाल कुरेशी हे आपल्या मुलाचे औषध घेण्याकरिता मेडिकलमध्ये जात होते. त्यांनी तोंडावर मास्क देखील लावलेला होता.
तरीही जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व इतर त्यांच्या बरोबर असणारे कर्मचारी आवारे मेजर, संग्राम जाधव, राऊत मेजर, संदीप आजबे मेजर यांनी कुरेशी यांना नाव विचारून रुपये पाचशे रुपये दंडाची पावती फाडली.
तरी देखील कुरेशी यांना पोलीसांनी अरेरावी करत जबर मारहाण केली. यामध्ये लांडकी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने त्यांच्या पोटावर, पायावर, माडीवर जबर मारहाण झाली आहे.
तेथील गावकर्यांनी औषधोपचारासाठी कुरेशी यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. पोलीस अधिकारी यांना सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करायची आहे का?,
जातीय द्वेषातून ही मारहाण केली गेली हा का? हा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. मास्क लावलेला असताना देखील कुरेशी यांना पोलीस अधिकारीने अमानुषपणे मारहाण केली असून, या घटनेचा समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी चौकशी करुन सर्वसामान्य नागरिकास अमानुषपणे मारहाण करणारे स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचार्यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|