गुटखा विकणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र राज्य सरकारचा आदेश न पाळता राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री सुरू होती. ५ जून रोजी फॅक्टरी परिसरात दोन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख याच्या खोलीमध्ये आरोपी पोपटलाल भंडारी राहणार राहुरी फॅक्टरी ता. राहुरी. हा महाराष्ट्र राज्य तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असलेली सुगंधी सुपारी व मसाला शरीरास अपायकारक होईल.तो खान्यासाठी अपायकारक आहे.

हे माहित असताना देखील त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तो पळुन गेला. त्याचे आजुबाजुला नाव गाव विचारले असता त्याचे नाव पोपटलाल भंडारी असल्याचे समजले.

यावेळी त्या ठिकाणाहून हिरा पूडे व मावा बनविण्याची सुपारी व तंबाखू असा ६,२१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.हवालदार सचिन ताजने यांच्या फिर्यादीवरून पोपटलाल भंडारी याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम – II 449/2021 भादंवि कलम 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तर दुसरी कारवाई ही शेटीया (पुर्ण नाव माहीत नाही) राहणार राहुरी फॅक्टरी याच्यावर करण्यात आली. फॅक्टरी परिसरातील साखर कारखाना कामगार वसाहत लाईन नं ५ खोली नं. १ या ठिकाणी आरोपी शेटीया (पुर्ण नाव माहीत नाही) हा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना दिसून आला.

पोलिसांनी छापा टाकल्याची चाहूल लागताच तो पण पसार झाला. यावेळी त्या ठिकाणाहून गुटखा व मावा बनवीण्याचे साहित्य असा २,९७८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

हवालदार आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत शेटीया नामक इसमावर भादवि कलम 188, 272, 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या दोन्ही करावाईत एकूण ९,१८८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र डावखर हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News