अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगर तालुका पोलिसांनी वाळकी शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत गावठी दारू , कच्चे रसायन असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून भट्टी चालक संतोष दिलीप पवार (रा. धोंडेवाडी, वाळकी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळकी येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू बनवून विक्री केली जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने धोंडेवाडी येथील तलावाजवळ सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला.
याप्रकरणी भट्टी चालक संतोष दिलीप पवार (रा. धोंडेवाडी, वाळकी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस हवालदार गणेश लबडे, महिला पोलीस हवालदार अमिना शेख, पोलीस हवालदार काळे, पोलीस नाईक बी. बी. कदम व योगेश ठाणगे यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम