पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडले याप्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली.

बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना अरणगाव येथे ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली उघडयावर जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यावरून पोलिस पथकाने छापा टाकला असता तेथे ५ जण तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेले आढळून आले.

या प्रकरणी राजू सुखदेव शिंदे, हनुमंत बबन कुताळ, नंदू आनंदा रणदिवे, बागूल नामदेव कुटे , राहुल लक्ष्मण आढाव (रा.आरणगाव ता. श्रीगोंदा) यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे,

पो.ना.संतोष गोमसाळे,पठारे ज्ञानेश्वर, पो.काँ. संपत गुंड, विकास कारखिले, सचिन पठारे,म.पो.काँ.सुरेखा वळवे, यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe