अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच याला रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. यातच राहुरी तालुक्यात पोलिसांनी अवैध धंदे चालकांवर कारवायांचे सत्र सुरु केले आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २५०० रूपयांचा दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वांबोरी ते सडे रोडवर प्रसाद शुगर कारखान्यासमोर अष्टविनायक हाँटेलचे भिंतीचे आडोशालाअवैध पद्धतीने दारूविक्री होत असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे १२०० रूपयांचा दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
याप्रकरणी आरोपी संदिप बाळासाहेब पागीरे (वय-२५ वर्षे रा. वांबोरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर येथीलच जवळ असलेल्या श्रीकृष्ण दुकानाच्या आडोशाला देखील पोलिसांनी छापा टाकला.
याठिकाणी पोलिसांना १५०० रूपयांचा दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे.
तर आरोपी रामकिसन माणिक दहिफळे (वय-36 वर्षे रा.प्रसाद शुगर कारखाना, वांबोरी ता.राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम