अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलिसांकडून कारवाई सत्र सुरूच आहे. नुकतेच राहुरीत एका मटका अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी धाड टाकून सुमारे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 16 जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व हॉटेल अमर जवळ अनेक महिन्यांपासून मटका सुरू होता.
याबाबत अहमदनगर येथील अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने तोफखाना पोलिस पथकाने त्या मटका अड्ड्यावर कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी मटका खेळण्याचे साहित्य, सहा मोटारसायकली व 23 हजार 50 रूपये रोख असा एकूण 3 लाख 35 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
तोफखाना पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन उत्तम जगताप यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगार्यांची नावे :- विशाल राजु शिंदे, सनी राजु शिंदे, वैभव राजु शिंदे तिघे राहणार मुलन माथा, पाण्याचे टाकीजवळ राहुरी, बाळासाहेब श्रीधर पवार, दिपक बारकु बर्डे, चरस रावसाहेब बर्डे, संजय बाजीराव अहीरे चौघे राहणार वरवंडी, नानासाहेब बाबुराव सोडनर राहणार घोरपडवाडी,
किरण भाऊसाहेब चव्हाण राहणार सडे, आकाश चंद्रकांत गुंजाळ, राहुल सोपान गुंजाळ, भाऊसाहेब सुखदेव गुंजाळ तिघे राहणार मुलन माथा, फिरोज शब्बीर शाहा राहणार कातोरे गल्ली, गणेश हीरामण खरात राहणार भिलहाटी,
प्रगती शाळा रोड, श्रीकांत राजेंद्र परदेशी राहणार कासार गल्ली तसेच गाळा मालक, किरण गोटीराम भाबड राहणार राहुरी या 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम