अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला.
मुद्देमालासह दोन जणांना ताब्यात घेतले. पहिली कारवाई देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर केली.
याठिकाणी आरोपी राजू जबाजी पंडित (वय 45 वर्षे, रा. देवळाली प्रवरा) हा मटका नावाचा जुगार घेत लोकांकडून पैसे घेऊन लोकांना चिठ्ठ्या देऊन खेळताना व खेळविताना मिळून आला.
यावेळी त्याच्याकडून मटका खेळण्याचे साहित्य व 1 हजार 512 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेत राहुरी पोलिसांत आरोपी राजू जबाजी पंडित याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई बाजारतळावरील एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर करण्यात आली. यावेळी आरोपी शकील गुलाब शेख (रा. देवळाली प्रवरा) हा मटका चालविताना आढळून आला.
पोलिसांनी ठिकाणाहून मटका खेळण्याचे साहित्य व 490 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच आरोपी शकील गुलाब शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनेत स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार शिवाजी अशोक ढाकणे यांनी फिर्याद दिली. दोन्ही घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार टिक्कल करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम