Post Office Schemes : गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पोस्ट ऑफिस देशातील प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या १० खास बचत योजना
पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही नोकरी न करताही भविष्य निर्वाह निधीचा लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत ग्राहकांना ७.१ टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडल्यावर तुम्हाला ४ टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, आरडी खात्यावर 6.2 टक्के व्याजदर दिला जात आहे.
नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, खातेदारांना 5 वर्षांच्या कालावधीत जास्तीत जास्त 7.5 टक्के व्याजदर मिळतो. त्याच वेळी, 1 वर्षासाठी 6.8 टक्के, 2 वर्षांसाठी 6.9 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.00 टक्के व्याज दिले जाते.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा ७.४ टक्के दराने व्याज मिळू शकते. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिक योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ८.२ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. या योजनेंतर्गत ८.०० टक्के दराने व्याजाचा लाभ दिला जात आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ग्राहकांना ७.७ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
किसान विकास पत्रामध्ये, ग्राहकांना 1 एप्रिल 2023 पासून 7.5 टक्के दराने चक्रवाढीच्या आधारावर व्याजाचा लाभ मिळत आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास एकूण 9 वर्षे आणि 7 महिन्यांत पैसे दुप्पट होतील.
सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. या योजनेंतर्गत महिलांना एकूण दोन वर्षांत ७.५ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही महिला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते.













