सरकार सत्तेवर आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामास प्राधान्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या कामास प्राधान्य देऊन मागील सरकारच्या काळातील कामापेक्षा भरीव अशी कामे केली असून

निळवंडे धरणाचे पाणी जिरायत भागास ऑक्टोबर २०२२ पर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत मागील सरकारच्या काळात निळवंडे धरणाची मार्च २०१९अखेर पर्यंतची कामाची स्थिती काय होती

व आज मार्च २०२१ अखेर परिस्थितीचा तुलनात्मक आढावा घेताना सांगितले, की मागील सरकारने निळवंडे धरणाच्या कालव्याच्या काम लवकरच पूर्ण करण्याची घोषणा तत्कालीन जलसंपदा मंर्त्यांनी तांभेरे येथे मोठा कार्यक्रम घेऊन केली होती.

तत्कालीन आमदारांनी या कामाबाबत मोठी फोटोग्राफी केली होती. त्यासाठी पोकलेन आणून काम सुरू झाल्याचे दृष्य उभे केले; पण दुसऱ्याच दिवशी डिझेलअभावी काम बंद पडले होते.

मागील सरकारच्या काळात मार्च २०१९ अखेर निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण ६४८ कामापैकी ६० कामे झाली, तर ५९ कामे प्रगतीपथावर होती. ५२९ कामे शिल्लक होती.

आघाडी सरकारने मार्च २०२१ अखेर ६४८ पैकी ३०७ कामे पूर्ण केली. ११६ कामे प्रगतीपथावर असून २२५ कामे शिल्लक आहेत.

राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामास प्राधान्य देण्याचा हट्ट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे व मी पाठपुरावा केला. आघाडी सरकारने या कामासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

या कामास निधीची कमतरता भासल्यास आणखी १०० ते १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दोन्ही कालव्यांची कामे ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमंत्रीत सोडून इतरांनी सहभागी होऊ नये, असे सांगितले होते, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe