अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोविड नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी राहुरी तालुका प्रशासन आता ॲक्शन मोड मधे सक्रिय झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तर उलट उत्तरे देणारे काही महाभाग लाठीचा प्रसादाचे मानकरी ठरले. गुरुवारी दुपारपासून शहरातील मुख्य बाजार पेठा,शनी मंदिर परिसर तसेच नगर मनमाड राज्य महामार्ग परिसरात संपूर्ण तालुका प्रशासन रस्त्यावर उतरले.
श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप,तहसीलदार फसियोद्दीय शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर,नायब तहसीलदार गणेश तळेकर,यांच्यासह महसूल, पोलिस, नगरपालिका,
पंचायत समिती अधिकारी कर्मचारी आदिंच्या पथकाने रस्त्यावर उतरून मास्क न वापरने,सामाजिक नियम अंतराचे उल्लंघन करणा-या व्यापारी नागरीकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यामध्ये कोरोणा आटोक्यात येत आहे. मात्र लग्नसमारंभात कोरोणा चा प्रसार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे लग्न आता लग्नासाठी घरातील नातेवाईकांनी आपल्या कोविड चाचण्या करून घ्याव्यात नंतर लग्न समारंभ ठेवावा त्यामुळे आजाराचा प्रसार होणार नाही.
तसेच यापुढे लग्न समारंभ स्थानिक स्वराज्य संस्थाची परवानगी घेने बंधनकारक आहे.नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सांगितले. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महसूल, पोलिस प्रशासन दिवस-राञ मेहनत घेत आहे.
परंतु नागरीकांनी देखील जबाबदाचे भान ठेवत विनाकारण ,विनामास्क फिरू नये,गर्दी करू नये अशा व्यक्ती आढळल्यास शंभर टक्के प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम