अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये आज शुक्रवार दि ३० एप्रिल रोजी सायंकाळी 6;30 दरम्यान पावसाचे पाणी घुसल्याने रुग्णांची धावपळ उडाली.
विलगीलरण कक्षातील रुग्णांना बेड सोडून अन्य ठिकाणी सहारा घ्यावा लागला. या ठिकाणी संबधित अधिकारी फिरकले नाहीत. सहारा लाँन्स मधील कोविड सेंटर रुग्णांचा सहारा हिरावला गेला.
देवळाली प्रवरा येथील शासनाच्यावतीने सहारा लाँन्स मध्ये कोविड सेंटर सूरु करण्यात आले असून या ठिकानी अनेक रूग्ण आहेत.आज वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने पावसाच्या सऱ्या व पाणी सरळ कोविडं सेंटरमध्ये घुसले
वादळीवाऱ्याने आडोसाशासाठी लावलेले कापड फाटल्याने आतमध्ये पावसाने रुग्णांना चांगलेच झोडपले. विद्युत पुरवठा खंडित त्यातच जोरदार पाऊस पडू लागल्याने रुग्णांचे बेड, बॅगा व अन्य साहित्य ओले झाल्याने त्याची एकच पळापळ झाली.
पावसाने रुग्णांची हाल झाली मात्र प्रशासनातील एका अधिकाऱ्यांनी कोविड सेंटर मधील रुग्णांकडे ढुंकूनही पाहिले नाही. काही स्थानिक तरूणांनी कोरोना अथवा अन्य कसला विचार न करता मदत कार्य केले.
सहारा लाँन्स मधील शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांचा सहाराच निसर्गाने हिरावून घेतला आहे. या मंगल कार्यालयात पूर्णपणे पाणी साचले असल्याने रुग्णांना आता रात्री झोपावे कसा असा प्रश्न निर्माण झाला असून
रात्र जागून काढण्याची दुर्देवी वेळ आली आहे. अवकाळी पावसाची अजूनही शक्यता असल्याने प्रशासनाने संपूर्ण परिसर पडदे लावून बंदिस्त करावा तसेच अन्य व्यवस्था करावी अशी मागणी रुग्णांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|