अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४९१ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार २०३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८५०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०५६ आणि अँटीजेन चाचणीत १५८७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७४, अकोले ०२, जामखेड १२०, कर्जत १०२, कोपरगाव ७७, नगर ग्रामीण ३३, नेवासा १५, पारनेर ३४, पाथर्डी ४८, राहता ७३, राहुरी ०४, संगमनेर ०२, शेवगाव ४५, श्रीगोंदा ५१, श्रीरामपूर ३३, कॅंटोन्मेंट बोर्ड ३४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४६८, अकोले ०४, जामखेड ०७, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १२६, नेवासा ३८, पारनेर ४६, पाथर्डी ०९, राहाता १५१, राहुरी २०, संगमनेर ३६, शेवगाव ०६, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ३४, कॅंटोन्मेंट बोर्ड २९ आणि इतर जिल्हा २३ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १५८७ जण बाधित आढळुन आले. मनपा २७३, अकोले ३५, जामखेड २७, कर्जत १३६, कोपरगाव २९, नगर ग्रामीण १९१, नेवासा ८७, पारनेर ८०, पाथर्डी ४१, राहाता १७७, राहुरी १३०, संगमनेर ८३, शेवगाव १५७ श्रीगोंदा ४५, श्रीरामपूर ४६, कॅन्टोन्मेंट बोर्ड ३३ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८३६, अकोले १८८, जामखेड ७९, कर्जत १५८, कोपरगाव १४३, नगर ग्रामीण ३४०, नेवासा २०४, पारनेर १२४, पाथर्डी १९३, राहाता ३११, राहुरी १९९, संगमनेर २१७, शेवगाव १५२, श्रीगोंदा ९८, श्रीरामपूर ९७, कॅन्टोन्मेंट ७४, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा १२६ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:१,३४,४९१
- उपचार सुरू असलेले रूग्ण:२३२०३
- मृत्यू:१८१५
- एकूण रूग्ण संख्या:१,५९,५०९
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|