चिंताजनक : अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार जणांचा घेतला कोरोनाने बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ इतकी झाली आहे.

दरम्यान मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांचे मृत्यू वाढतच असून वर्षभरात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त मृत्यू जिल्ह्यात कोरोना मुळे झाले आहेत, नगर जिल्ह्यातील २०७१ नागरिकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३८२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७१२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२८८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८७ आणि अँटीजेन चाचणीत ९४७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८१, अकोले १५१, जामखेड ०१, कर्जत २०६, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण ९३, नेवासा १९, पारनेर ३६, पाथर्डी ९७, राहता ६२, राहुरी ४६, संगमनेर १७२, शेवगाव १३३, श्रीगोंदा ७९, श्रीरामपूर २९, कॅंटोन्मेंट बोर्ड २८, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३०७, अकोले ४१, जामखेड ११, कर्जत २९, कोपरगाव ७२, नगर ग्रामीण १५९, नेवासा १०८, पारनेर ५४, पाथर्डी ०९, राहाता १६०, राहुरी ४१, संगमनेर ३७२, शेवगाव २०, श्रीगोंदा ४६, श्रीरामपूर ६९, कॅंटोन्मेंट बोर्ड २८ आणि इतर जिल्हा ५७ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ९४७ जण बाधित आढळुन आले. मनपा १५९, जामखेड ०६, कर्जत ३२, कोपरगाव १०३, नगर ग्रामीण ६५, नेवासा ४४, पारनेर १११, पाथर्डी २१, राहाता ३७, राहुरी १००, संगमनेर २२, शेवगाव ०२, श्रीगोंदा २२२, श्रीरामपूर ०६, कॅंटोन्मेंट ०५ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ९४९, अकोले ११५, जामखेड १३७, कर्जत १३७, कोपरगाव १४९, नगर ग्रामीण ३७१, नेवासा २४६, पारनेर १८५, पाथर्डी १०८, राहाता ३०६, राहुरी १८०, संगमनेर २९७, शेवगाव १३८, श्रीगोंदा १५४, श्रीरामपूर १५८, कॅन्टोन्मेंट ७४, मिलिटरी हॉस्पिटल ०८, इतर जिल्हा २६ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,५७,२९८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२३७१२
  • मृत्यू:२०७१
  • एकूण रूग्ण संख्या:१,८३,०८१
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe