अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला दुर्गगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी ॲड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री व गृहमंर्त्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे.
जरे यांची दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी गळा चिरून निघृर्ण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाळ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी बोठेसह इतर आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलेची निघृर्ण हत्या होणे ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. हा खटला दुर्तगती न्यायालयात चालविण्यात यावा, असे ॲड. लगड यांनी निवेदनात म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम