आ.रोहित पवारांच्या माध्यमातून १५० वर्षे जुन्या घाट पाय-यांची दुरुस्ती.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असणा-या स्मारकाला स्थानिक आ. रोहित पवार यांनी आज भेट दिली.

चौंडी येथील वाडा आणि महादेव मंदिर परिसरातील पायऱ्यांना अहिल्यादेवी घाट म्हणून ओळखले जाते. गेल्या १५० हून अधिक वर्षांपासून हा घाट मातीत बुजला होता.

स्थानिक आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून बीजीएस व नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने त्यावरील माती काढून दुरुस्ती करण्यात आली.

आज ऱविवारी आ. रोहित पवार यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा घाट धुवून स्वच्छ करून पूजा केली.

यावेळी आ. रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय होण्याची इच्छा व्यक्त करीत त्या दृष्टीकोनातून प्रय़त्न सुरु असल्याचे सांगितले.

याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे संग्रहालय झाल्यास एक प्रेरणादायी पर्यटनस्थळ विकसित होऊन यामुळे गावचा, तालुक्याचा विकास होईल.

तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे आय़ोजित केल्यास अहिल्यादेवींचे अनमोल विचार नव्या पिढीत रुजण्यास मदत होईल असेही आ. रोहित पवार याप्रसंगी म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe