अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत आहे.
रोहित पवारांच्या या टोलेबाजीमुळे अनेकदा विरोधक पार घायाळ झाल्याचे दिसते.आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी भाजपला लक्ष केले आहे. निमित्त होते प्रश्नम संस्थेने जाहिर केलेल्या सर्वेक्षणाचे.
या अहवालात देशातील १३ राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. यावरून रोहित पवारांनी भाजपला चिमटा काढत जोरदार टोला लगावला आहे.
पवारांनी ट्विट करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करत असतानाच भाजपवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील १३ राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
त्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले की, “प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं.
याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे. यानंतर दुसरे ट्विट करत त्यांनी भापवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले,
उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये.
विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!” असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम