माझ्यासोबत पळून चल, नाहीतर मी आत्महत्या करेल

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- माझ्यासोबत पळून चल, नाहीतर मी आत्मत्या करेल असे म्हणत अल्पवयीन तरूणीला धमकी दिल्याप्रकरणी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी प्रकाश रावसाहेब उमाप (वय 20, रा. नालेगाव, नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माझ्याशी प्रेसंबंध ठेव अशी वारंवार मागणी आरोपी प्रकाश उमाप हा पिडीत तरूणीकडे करत होता.

पिडीतेने उमाप याला नकार दिला असता त्याने पिडीतेच्या घराजवळ येवून गाडीचा हॉर्न व शिट्टी वाजवून तसेच तिचा पाठलाग करून मानसिक त्रास दिला.

आरोपी उमाप याच्या त्रासाला कंटाळून पिडीत तरूणीनी तिच्या काकांच्या घरी गेली असता आरोपी उमाप तिच्या काकांच्या फोनवर फोन करून माझ्यासोबत पळून चल अन्यथा मी आत्महत्या करेल,

अशी धमकी दिली. तसेच तरुणाने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना देखील धमकावले होते. यासंदर्भात पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.