अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामधील वादाच्या ठिणग्या पेटू लागल्या आहेत.
एका प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे चांगलेच कडाडले आणि म्हणाले, आपल्याला कोणी शिकविण्याची गरज नाही, आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार आहोत.
अशा शब्दात त्यांनी पाटलांना टोला लगावला आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे आज नगर दौऱ्यावर आले असताना त्यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्भयाच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली.
यातच पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोप -प्रत्यारोपवरून संभाजीराजेंना प्रश्न केला असता. त्यांनी पाटलांवर चांगलाच शाब्दिक वार केला. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, ‘मी २००७ पासून मराठा समाजाच्या लढ्यात आहे. चंद्रकांत पाटील यात केव्हा आले हे मला माहिती नाही.
ते तुम्ही त्यांनाच विचारा. त्यामुळे कोणी काही शिकविण्याची गरज नाही. ते मी ऐकण्याचेही कारण नाही. हा सल्ला जर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस देत असतील तर मी ऐकू शकतो. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मी छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांचा वंशज आहे.
त्यामुळे कोणत्याही आंदोलनाच्या निमित्ताने जनतेला वेठीस धरण्याचे काम मुळीच करणार नाही. हा लढा कायेदशीर आणि सनदीशीर मार्गाने सुरू राहिला पाहिजे. व सर्व समाजाला वेठीस धरण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी तो सोडवावा, असा आमचा अग्रह आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम