नंदादीप ऑटोेमोबाईलचे संतोष गुंदेचा यांचे निधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  वसंत टॉकिज रोड येथील नंदादीप ऑटोमोबाईलचे संचालक संतोष चंदनमल गुंदेचा यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षांचे होते.

त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

स्व.संतोष गुंदेचा यांच्या पश्चात आई, रमेश, विलास, मनोज हे भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

मनमिळावू व सामाजिक कार्यात ते नेहमीच सहभागी असत. चंदन प्लॅस्टिक फर्मचे रमेशशेठ गुंदेचा यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या अकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe