अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- एका वृद्ध शेतकरी आपल्या शेळ्या चारत असताना अचानक वीजप्रवाह करणारी तार तुटली. व या तारेतील विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सात शेळ्यांचा मृत्यू झाला.
त्याचबरोबर शेळ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा देखील मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील पळवे येथे घडली आहे. या दुर्घटनेत दामोदर पाचरणे (वय ६५) या वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पळवे खुर्द शेतकरी दामोदर बापू पाचरणे हे आपल्या १३ शेळ्या शेतामध्ये चारत होते.
यावेळी अचानक विद्युत प्रवाहाची तार तुटून शेळ्यांना विजेचा शॉक बसून त्यातील 7 शेळ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी पाचरणे हे शेळ्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले, मात्र विद्युत तारेला चिकटल्याने त्यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान या दुर्घटनेबाबत माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वीज वितरण कंपनीला विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही.
शेळ्यांचा व शेतकऱ्याचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही महावितरणचा जीर्ण झालेल्या तारा तसेच लोंबकळणाऱ्या वीज तारा यामुळे अपघात घडले आहे.
याची मोठी किंमत ही नेहमीच शेतकऱ्याला चुकवावी लागत आहे. मात्र तरीही महावितरणकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम