अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- नाजूक’ प्रकरणातील कारणावरुन सोमनाथ तांबे याच्यावर भेंडा येथे रविवारी व्हॉलीबॉल मैदानावर गावठ्ठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गावठी कट्टा ही जप्त करण्यात आला आहे. नेवासे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली.
भेंडा गोळीबारातील जखमी सोमनाथ तांबे याच्या फिर्यादीवरुन व वर्णनावरुन कुकाणे येथील पप्पू जावळे व गणेश पुंड या दोघांना अटक केली होती.
मात्र पोलिसांना गोळीबाराचे कारण मिळून येत नसल्याने संशय होता. पोलिस निरिक्षक विजय करे यांनी गुन्ह्यातील फिर्यादीला विश्वासात घेत विचारपुस केली असता ‘नाजूक’ कारणावरुन सोमनाथ तांबे याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार या गुन्ह्यात समोर आला व आरोपींनी खोटा बनाव केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी ५० पेक्षा जास्त साक्षीदार तपासत पोलिस २४ तासांत खऱ्या गुन्हेगारांपर्यत पोहचले व या गुन्ह्यातील पाच आरोपी व गोळीबार प्रकरणात गुन्हेगारांना आश्रय देणारे पाच अशा १० आरोपींना नेवासे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय ठाकूर व उपनिरिक्षक भरत दाते यांच्या पथकाच्या दोन तुकड्या पाठवल्या होत्या.
यात शहरटाकळी येथून गोळीबार प्रकरणात गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात शुभम विश्वनाथ गर्जे, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे,
अमोल राजेंद्र शेजवळ, शुभम किशोर जोशी, प्रसाद शिवाजी दळवी (रा.शहरटाकळी ता.शेवगाव), अक्षय संजय आपशेटे,ओंकार राजें काकडे, अमोल अशोक गडाख, अमोल राजेंद्र शेजवळ यांना अटक केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|