अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात विमा आणि आरटीओ प्रतिनिधी () म्हणून काम करणारे गुलाब रानुजी मोढवे (वय ५८, रा. राहुरी फॅक्टरी) यांचा मृतदेह मुळा धरणात आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसांपासून मोढवे बेपत्ता होते. सकाळी सातच्या सुमारास पेपर आणण्यासाठी जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर घरी आलेच नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आणि शोध सुरू केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळा धरणात वावरथ-जांभळी शिवारात पाण्यात कडेला एक मृतदेह तंरगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह गुलाब मोढवे यांचाच असल्याचे आढळून आले.
दरम्यान मोढवे यांच्या मृतदेहाजवळ किंवा घरी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात यासंबंधी अद्याप पोलिसांनी काहीही निष्कर्ष काढलेला नाही.
हातातील काम जाणार असल्याने होते चिंतातुर :- मोढवे विमा व आरटीओ प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. ऑनलाइन पद्धतीने काम चालणार असल्याने परिवहन कार्यालये बंद होणार, तेव्हापासून मोढवे अस्वस्थ होते.
आधीच लॉकडाउनचा फटका बसलेला असताना आरटीओ बंद झाल्यावर आपले कसे होणार, या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा तर्क लावला जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम