अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर शहरातील अत्यंत वर्दळीचा ठिकाण असलेले नागापूर एमआयडीसीतील ड्रीलको कंपनी परिसरात तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
याबाबत सिद्धार्थ शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्राणघातक हल्ल्यात सिद्धार्थ रावसाहेब शिंदे व त्याचे मित्र किरण रवी सोनवणे, सागर दिलीप गायकवाड रा. निंबळक ता. नगर असे तिघे जण जखमी झाले आहे.
या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल जॉय त्रिभुवन, आनेश ऊर्फ अनिस ऊर्फ अण्णा बाळू पवार, सुमित बाबासाहेब थोरात (तिघे रा. गजानन कॉलनी), लपक्या ऊर्फ अनिकेत सोमवंशी (रा. चेतना कॉलनी) व एक अनोळखी व्यक्ती असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी ड्रिलको कंपनी परिसरात गांजा ओढत असताना त्या ठिकाणी सिद्धार्थ शिंदे हे त्यांचा मित्र अक्षय सानप यांना शोधण्यासाठी गेले होते. यावेळी आनेश पवार याने शिंदे यांच्या तोंडात मारली.
त्यानंतर शिंदे हे त्यांचे मित्र सागर गायकवाड, अजय गुळवे, प्रशांत पवार, किरण सोनवणे यांना मिटवा मिटवी करण्यासाठी ड्रिलको कंपनी परिसरात घेऊन गेले. त्याठिकाणी असलेल्या आनेश पवार याने किरण सोनवणे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
यावेळी शिंदे यांनी पवार याच्या हातातून कोयता ओढण्याचा प्रयत्न केला असता पवार याने शिंदेवर हल्ला करून त्यांना जखमी केले.
लपक्या सोमवंशी याने त्याच्याकडील कोयत्याने सागर गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम