धक्कादायक ! कालव्यात पडून मृत्यू तरुणाचा दुर्दैव मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  राहाता तालुक्यातील राजुरी येथे प्रवरा डाव्या कालव्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुनील सिताराम पंडित असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनिल पंडित (वय 37) हे दुपारच्या दरम्यान कालव्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते अचानक पाण्याच्या खाली गेले.

यानंतर तेथे आजूबाजूला धुणे धुण्यासाठी असणार्‍या महिलांच्या ही बाब लक्षात आली. हे पाहताच त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे युवकांनी प्रवरा कालव्याकडे धाव घेऊन

या इसमाचा शोधाशोध सुरू केल्यानंतर त्यांचा दगडाला अडकलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यांना प्रवरा हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती राजुरीचे पोलीस पाटील रावसाहेब गोरे यांनी लोणी पोलीस स्टेशनला दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.