अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- शेतात नांगरणी करण्याच्या कारणावरून एका तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान हि धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली आहे. याप्रकरणी मुसा मेहबूब पठाण (वय 36 वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ब्राम्हणी येथील शेत नांगरणी करण्याच्या कारणावरून मुसा पठाण याच्यावर पाच जणांनी मिळून कोयत्याने वार केले.
तसेच गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पठाण याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी शब्बीर मिरसाहब शेख, नवाब मीरसाहब शेख, नसीर शेख, सद्दाम शब्बीर शेख,
अल्ताफ नवाब शेख व सुन्ना अहमद शेख (सर्व राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी) या सहा जणांवर जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार पारधी करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम