अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे वांबोरीत आले असताना, त्यांच्यासमोरच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे व प्रा. राधेशाम पटारे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
स्थानिक पातळीवरील राजकारणात धुमसत असलेली शेरेबाजी समक्ष झाली. वांबोरी ग्रामपंचायतीत बैठकीनंतर सरपंच व सदस्यांच्या वतीने खासदार तनपुरे यांचा सन्मान करण्याचे नियोजन होते.
परंतु, तनपुरे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी तनपुरे यांना, तुम्ही जर वांबोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदरचा सत्कार स्वीकारला नसता, तर आता ग्रामपंचायतीचा सरपंच आपला असता असे सांगितले.
दरम्यान, वांबोरी ग्रामपंचायतीत काहींच्या स्नुषा तसेच पत्नी सदस्य आहेत. परंतु त्यांचे काम त्यांचे पती बघतात ते चालते मग बाबासाहेब भिटे ग्रामपंचायतीत येऊन बसण्याबाबतच तक्रारी का, होतात असे विचारले.
त्याचवेळी प्रा. शाम पटारे यांनी, काहीही बोलू नका माझी सून निवडून आल्यापासून मी ग्रामपंचायतीत आलो नाही.आमच्यावर बेछुट खोटे आरोप करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून एकदाच मारून टाका अशा शब्दात खासदार तनपुरे यांच्या समोरच हा खडांजी झाली.
तनपुरे यांनी मध्यस्थी केली. कोरोनाचा प्रसंग असा आहे की, सर्वांनी राजकारण बाजुला ठेऊन कोरोनासारख्या महामारीशी लढले पाहिजे.
या परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारणाची नाही, सर्वांनी एकत्र या हे मी सर्वांना सांगितले. तुमचे वाद असतील तर बाजुला ठेवा, असा सल्ला तनपुरे यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम