अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांची बेफिकीरी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे.
यामुळे कोरोनाचे संक्रमण आणि वाढती आकडेवारी यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासन सतर्क झाले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मिरजगाव शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर मिरजगाव भागातील सर्व दुकानदार, फळे व भाजी विक्रेते या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
आज २८ मार्च रोजी सकाळी दहावाजेपासून ही चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, मिरजगाव येथे ही चाचणी घेतली जाणार अजून विक्रेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|