अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौरा करत आहे. काल त्यांनी अहमदनगरमधील कोपर्डीला भेट दिली.
यावेळी प्रवासाच्या दरम्यान संभाजीराजेंचा साधेपणा पाहण्यास मिळाला. रस्त्याच्या बाजूला थांबून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे औरंगाबादच्या दिशेनं रवाना झाले.
या दौऱ्यातही त्यांचा साधेपणा दिसून आला.जेवणासाठी संभाजीराजेंचा ताफा एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात थांबला. कोपर्डी येथून कर्जतला परतत असताना, वाटेत ते वाघवस्ती येथील एका शेतात थांबले.
दुपारची वेळ होती. त्यामुळं घरून आणलेल्या डब्यातील जेवण त्यांनी बाहेर काढले. तेथील औतावर बसून त्यांनी जेवण केलं. यावेळी संभाजीराजेंनी शेतामधील औतावर बसून जेवण केलं. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही शेतातच जेवण उरकले.
यावेळी शेतामधील आवतावर बसून जेवण केल्याने या साधेपणाचे जेवणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.त्यांचा साधेपणा दाखविणारे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे.
मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. सध्या संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज, शनिवारी ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे आले होते.
कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने या खटल्यासाठी विशेष बेंच स्थापन करून खटला फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबातील न्याय द्यावा,
अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. या वेळी संभाजीराजेंनी कोपर्डीच्या भगिनी यांना अभिवादन केले आणि पीडित कुटुंबाशी चर्चा केली. या वेळी आपल्याला न्याय मिळाला नाही, अशा भावना पीडित कुटुंबांनी राजे यांच्या समोर मांडल्या होत्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम