अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- पाण्याचा प्लॅन्ट टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आनण्यासाठी नेहमी होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासु सासर्यांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना जामखेडमध्ये घडली आहे. अमरीन शेख असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. तर मौज्जम अल्ताफ शेख (पती), अल्ताफ हुसेन शेख (सासरा) व शहीन अल्ताफ शेख (सासू) (रा. द्रोणागीरी कॉलनी) या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत विवाहिता अमरीन शेख हीचे दिड वर्षापुर्वी लग्न झाले होते. मात्र सासरकडील लोक तिला आपल्या पिण्याच्या पाण्याच्या प्लँटचे नवीन साहित्य आणण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून तीला वेळोवेळी त्रास देऊन शिविगाळ व मारहाण करत होते.
तसेच दोन लाख रुपये आणले नाहीत, तर तु सासरी रहायचे नाही तु तुझ्या माहेरी निघून जा. असे म्हणुन वेळोवेळी छळ केला जात होता. याच त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
अशी फिर्याद मयत मुलीचे वडील शब्बीर इस्माईल पठाण (रा.कानडी ता.आष्टी) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे. याबाबत अधिक तपास जामखेड पोलिस करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम