दोन नेत्यात जमिनीच्या वादातून झाले असे काही… तालुक्यात उडाली खळबळ !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका मोठ्या गावात शेतीच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित गाव नेत्यांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच चांगलीच झोंबाझोंबी झाल्याचे वृत्त आहे.

दोघेही राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, त्यातील एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती नातेवाईक असून दुसरा नेता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जवळचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News