घराच्या छतावर सुरु करा “हा” व्यवसाय, जाणून घ्या फायदे !

Sonali Shelar
Published:
Business Idea

Business Idea : जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज म्ही तुमच्यासाठी एक भन्नाट कल्पना घेऊन आलो आहोत. या व्यवसायात अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सुरु करून चांगले उत्पन्न मिळवू शकता, चला तर मग कोणते आहेत हे व्यवसाय प्लॅन जाणून घेऊया.

जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर त्याचे नाव टेरेस फार्मिंग व्यवसाय आहे. म्हणजे टेरेस वर केली जणारी शेती. होय, जर तुम्ही मोठ्या घरात राहत असाल आणि तुमच्या घराचे छप्पर मोठे असेल तर तुम्ही घराच्या छतावर शेती करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

यासाठी घराच्या छतावर पॉलीबॅगमध्ये भाजीपाल्याची रोपे लावावी लागतात. ही संकल्पना म्हणजेच टेरेस गार्डनिंगची संकल्पना जागेवर अवलंबून आहे. ठिबक पद्धतीने याला पाणी देता येते. एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की तुमच्या छतावर चांगला सूर्यप्रकाश असावा.

यासोबतच तुमच्या घराच्या छतावर सोलर प्लांट बसवून तुम्ही चांगली कमाई करू शकता. यामुळे तुमचे वीज बिल तर वाचतेच, पण तुम्ही त्यातून मोठी कमाई देखील करू शकता. सरकारकडूनही या व्यवसायाला चालना दिली जात आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रारंभिक गुंतवणूक करावी लागेल.

तुमच्या इमारतीचे छत मोबाईल कंपन्यांना भाड्याने देऊनही तुम्ही मोठी रक्कम कमवू शकता. तुमच्या घराच्या छतावर मोबाईल टॉवर बसवला की कंपनीकडून दर महिन्याला काही रक्कम दिली जाते. त्यासाठी स्थानिक महापालिकेची परवानगी घ्यावी लागेल. तुमच्या घराच्या छतावर मोबाईल टॉवर बसवण्यासाठी तुम्ही थेट मोबाईल कंपन्या किंवा टॉवर ऑपरेट करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe