अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यात अनेकांचा मृत्यू होत आहे. पुढील सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत होती.
परंतु मनपाचे हे कार्यालखच बंद असल्याने सदरचे दाखले देण्यात येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत होती. मात्र याबाबत सभाग्रह नेते रवींद्र बारस्कर यांनी मनपा आयुक्तांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करून हे कार्यालय सुरू केले आहे.
शहरात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे मनपाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यासाठी सदरील विभागातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुक कोवीड सेंटर व कॅन्टोन्मेंट झोनमध्ये करण्यात आल्या होत्या.
यामुळे मनपाचे जन्म मृत्यू विभाग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. कोरोना संसर्ग विषाणूमुळे दुर्दैवाने मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शहरात त्यांच्यावर मनपाच्या वतीने अंत्यविधी केला जात आहेत.
यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यू दाखल्याची इतर शासकीय कामासाठी अत्यंत गरज भासत आहे. त्यामुळे हे नातेवाईक नगरसेवक, पदाधिकारी व मनपामध्ये दाखला मिळण्यासाठी हेलपाटे मारत आहेत.
तरी या नातेवाईकांची गैरसोय निर्माण होवू नये यासाठी आयुक्तांशी चर्चा करून जन्म मृत्यू विभाग सुरू करण्याची त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी आता हा विभाग सुरू करण्यास परवानगी दिल्याने आता मनपाच्या जन्म मृत्यू कार्यायातून संबंधित दाखले देण्यास सुरूवात झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम