अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय ५० लाख रुपयांचा पुरस्कार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत लोणी ग्रामपंचायतीने मिळवलेल्या

राज्‍यस्‍तरीय ५० लाख रुपयांच्या व्दितीय पुरस्‍काराबद्दल आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्‍य साधून मुख्‍यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या हस्‍तें ऑनलाईन कार्यक्रमात लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्‍कार देवून गौरविण्‍यात आले.

राज्याच्या पर्यावरण विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत सन २०२०-२१ मध्ये भुमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत पाच गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्‍पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. स्पर्धेसाठी असलेल्या सर्व निकषांची पूर्तता लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून पूर्ण केली.

लोणी बुद्रुक, ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील,

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्‍या सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करून या मिळवलेल्या यशाबद्दल सन्मानित केले. या प्रसंगी सिनेट सदस्‍य अनिल विखे, सरपंच सौ.कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे,

माजी उपसरपंच अनिल विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, भाऊसाहेब विखे, प्रविण विखे, संतोष विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे,सचिन ब्राम्‍हणे, मयुर मैड, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी सौ.कविता आहेर आदि उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!