अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी RT -PCR टेस्ट ही जास्त प्रकारे व्हायला पाहिजे मात्र ती होत नाही ही गंभीर बाब आहे. आगामी काळामध्ये त्या जास्तीत जास्त टेस्ट वाढवण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहे,.
तसेच जे कुणी विनाकारण रस्त्यावर फिरत असतात अशांच्या संदर्भांमध्ये त्यांची सुद्धा चाचणी करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी जिल्हा पोलीस अधीक्षक करणार आहे.

विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी आज अहमदनगर येथे भेट दिली. यावेळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी श्री. गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गासंदर्भातील सद्यस्थिती, रुग्णवाढ, कोणत्या भागात जास्त प्रादुर्भाव आहे, त्याची कारणे, त्याठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजना,
रेमडेसीवीर उपलब्धता आणि वितरण, लसीकरण मोहिम, आरटीपीसीआर आणि अॅण्टीजेन चाचण्यांचे तालुकानिहाय प्रमाण, रुग्णबाधित निघण्याचे प्रमाण याबाबत तपशीलवार माहिती घेतली.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्याही आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. किमान एका बाधित रुग्णामागे किमान २० व्यक्तींच्या चाचण्या केल्या जाणे आवश्यक आहे.
विनाकारण रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची अॅण्टीजेन चाचणी करण्यासाठी अॅण्टीजेन कीटस् उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|