अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या महिन्यापासून राहाता तालुक्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणायला सरकारी यंत्रणेला अपयश आले असून मोठे प्रयत्न करूनही रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे.
काल बुधवारी 219 हा वर्षभरात विक्रमी रुग्णांचा आकडा समोर आला आहे. यामध्ये शिर्डी, राहाता, लोणी, साकुरी व पाथरे ही सर्वाधिक रुग्णसंख्या असलेली गावे आहेत.
तालुक्यातील 35 गावांत करोनाचा फैलाव झाला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.तालुक्यात सर्वाधीक 44 रुग्ण दोन्ही लोणी गावात सापडले आहेत.
शिर्डीत 40 रुग्ण, राहाता 26 रुग्ण, पाथरे गावात एकाच कुटुंबातील 14 जणांना करोनाची बाधा झाली असून साकुरीतही 13 रुग्ण सापडले. तसेच इतर गावठी रुग्ण वाढू लागले आहे.
राहाता तालुक्यात करोना टेस्ट वाढविण्यात आल्या असून 1 मार्च ते 30 मार्च या दरम्यान 7 हजारांवर विविध करोना टेस्ट केल्या असून यात 1761 जण करोना बाधित निघाले असून 600 च्या वर रुग्ण विविध रुग्णालयांत व कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|