अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याची घटना घडल्याचे समजते आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यातील वळण गावांमध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/05/08criminal-attacked-police_202003383883.jpg)
file photo
राहुरी तालुक्यातील वळण गावात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी राहुरी पोलीस छापा टाकण्यासाठी गेले असता या ठिकाणी बसलेल्या अज्ञात व्यक्तीची आणि पोलिसात अज्ञात कारणावरून बाचाबाची झाली.
याचं रूपांतर पुढे दगडफेकीत झालं काही क्षणात या ठिकाणी पोलिसांचा ताफा दाखल झाला. मात्र अज्ञात दगडफेक करणारी व्यक्ती पसार झाली.
पोलिसांवर दगडफेक कुठल्या कारणातून झाली हे मात्र समजू शकले नाही. घडलेल्या प्रकारावर पोलिसांनी नकार दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|