अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- तालुक्यातील सर्वसामान्य जनता नेहमीच माझ्या सुखात व दु:खात बरोबर असल्याने मला नेहमी आपल्या सर्वांच्या रूपाने प्रेरणा मिळते. माझे जीवन नेहमीच संघर्षमय आहे, व संघर्षाचे रूपांतर नेहमी विजयात होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
शेंडी गाव हे माझे हक्काचे गाव आहे, ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने आपण भारून गेलो आहोत. असे मत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा बॅकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नगर तालुक्यातील शेंडी गावच्या ग्रामस्थांच्यावतीने महानुभाव पंथाचे साधू गोविंद बाबा यांच्या हस्ते कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. यावेळी रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे सर यांनी सर्वांच्या वतीने कर्डिलेंना शुभेच्छा दिल्या व त्यांच्यामुळे आम्हला नेहमीच गावपातळीवर काम करण्यासाठी हुरूप मिळते. यापुढेही साहेबांच्या मार्गदर्शनखाली गावातील असणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|