अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- मनुष्यांप्रमाणे प्राणीमात्रांवर देखील प्रेम केले पाहिजे हे आपण जाणतो मात्र याचाच प्रत्यय राहुरी मध्ये आलेला दिसून आला आहे.
जखमी अस्वस्थेत असलेल्या एका नागावर राहुरी येथील सर्पमित्रांनी शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिले. दरम्यान, तो पूर्ण बरा होईपर्यंत सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांच्या देखरेखखाली ठेवण्यात येणार आहे. नाग बरा होताच त्याला जंगलात मुक्त केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी येथे एक 5 फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला नाग रात्रभर पत्र्यामध्ये अडकून बसला होता. तेव्हा तेथील नागरिकांनी वन्यजीव प्रेमी अभी सांगळे यांना बोलाविले. अभी सांगळे यांनी जाऊन बघितले असता नाग मोठ्या प्रमाणात जखमी असल्याचे आढळले.
त्यांनी ताबडतोब राहुरी येथील सर्पमित्र कृष्णा पोपळघट सांगितले. पोपळघट यांनी नागाला घेऊन वनविभाग कार्यालय गाठले व वनपरीक्षेत्र अधिकार्यांना माहिती देताच त्यांनी नागावर उपचार करण्यासंबंधी टाकळी मिया येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे यांना उपचार करण्यास सांगितले.
जखमी नागावर 12 टाक्यांच्या अर्ध्यातासाची शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान यामुळे या जखमी नागाचे प्राण वाचले आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांदेखील जीव असतो व त्यांचा जीव वाचविणे आपले कर्तव्य आहे, याचाच प्रत्यय यामधून आलेला दिसून आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम