अहमदनगर जिल्ह्यातील आश्चर्य… बोकड्या देतोय दररोज अर्धा लिटर दुध

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-निसर्गाचा चमत्कार म्हणावं की नेमकी काय? राहुरीत एक बोकड चक्क दररोज अर्धा लिटर दुध देत असल्याचे आढळून आले आहे.

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील मेंढपाळ सुभाष किसन गावडे यांचा दिड वर्षीय बोकड दररोज अर्धा लिटर दुध देतो.त्यामुळे सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा बनला आहे.

राजा नावाचा दिड वर्षाचा बोकड अनेक दिवसापासून सातत्याने दूध देत आहे. त्या बोकडापासून पैदास झालेल्या बकरू देखील उत्तम प्रतीचे दूध देत असून ते निरोगी आहे.

राजा हा काठेवाडी प्रजातीचा बोकडा असून तो रोज दूध देतो व त्याच्या पासून झालेली पैदास देखील तो उत्कृष्ट असल्याचे सुभाष गावडे यांनी यावेळी सांगितले.

राहूरी कृषी विद्यापीठाने या बोकडावर संशोधन करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

राजा नावाचा दूध देणारा बोकड पाहण्यासाठी परिसरातील लोक गावडे यांच्याकडे दररोज गर्दी करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe