शेवगावच्या ‘त्या’ लाचखोर पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-वाळूची ट्रक सोडण्यासाठी लाच मागणाऱ्या शेवगाव पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हि आक्रमक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल करणार असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली आहे.

हे आहेत ते लाचखोर पोलीस कर्मचारी :- वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी) संदिप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव),

कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) असे निलंबित केलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे पसार झाले आहे.

लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे उपअधीक्षक मुंढे आले अडचणीत :- शेवगावचे उपअधीक्षक मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचार्‍यांनी लाच मागितल्याने उपअधीक्षक मुंढे अडचणीत आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पोलीस खात्याअंतर्गत चौकशी होणार आहे. तसेच लाचलुचपत विभागाचे तपासी अधिकारी हे उपअधीक्षक मुंढे यांची चौकशी करणार आहे.

त्यांना कार्यालयात चौकशीसाठी बोलविले जाईल, अशी माहिती लाचलुचपतचे उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या पोलिसांना शोधण्यासाठी आमचे पथक काम करत आहे. त्यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe